कलातपस्वींचे व्यासपीठ आणि नवोदितांसाठी खुले अवकाश
१८८३ पासून शास्त्रीय संगीत, नृत्य आणि नाट्य यांची समृद्ध परंपरा जोपासणारी देवल क्लब ही संस्था. इथे दिग्गज कलाकारांच्या उत्तमोत्तम सादरीकरणासोबतच उभरत्या कलाकारांना घडवले जाते.
आमच्या उपलब्धी

तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन
शास्त्रीय संगीत, नृत्य आणि नाट्याच्या शिक्षणासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनातून तयार केलेला अभ्यासक्रम गुरु - शिष्य परंपरेशी जवळीक साधून तज्ञ मार्गदर्शकांकडून शिकवला जातो.

सादरीकरणाचे अवकाश
उदयोन्मुख कलाकारांना तालिम व नाविन्यपूर्ण सादरीकरणासाठी उत्कृष्ट दर्जाच्या सोयी उपलब्ध आहेत. यामुळे कलाकार समृद्ध सांस्कृतिक वारशाशी जोडले जातात आणि नवनवीन दर्जेदारप्रयोगांसाठी प्रोत्साहीत होतात.

समृद्ध वारशाचे जतन
संशोधन आणि संग्रहणाचा अमूल्य ठेवा समाजात कलांबद्दल आणि कलाकारांबद्दल सांस्कृतिक जाणिवा वाढायला मदत करतो.
वारसा आणि उद्देश
गायन समाज देवल क्लब ही हिंदुस्तानी संगीत, नृत्य आणि नाट्यकलेचे संवर्धन करण्यासाठी आणि कलांचे अभिजात सौन्दर्य जपले जावे यासाठी प्रयत्नशील असणारी संस्था आहे.
उभरत्या कलाकारांना गुरु – शिष्य परंपरेशी जवळीक साधत कलेमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते.
दर्जेदार सुविधा, समृद्ध कला संग्रह आणि उत्तोमत्तम कार्यक्रमाचा अनुभव कलाकारांना समृद्ध बनवतो.













