गायन समाज देवल क्लब येथील संगीत उपलब्धी

गायन समाज देवल क्लब येथील संगीत उपलब्धी

पारंपरिक आणि उत्कृष्टतेवर आधारित, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि वाद्य अभ्यासक्रम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देतात. तुम्ही गायनात प्रभुत्व मिळवण्याची आकांक्षा बाळगत असाल किंवा वाद्ये, आमचे अभ्यासक्रम तुम्हाला वास्तविक जगाच्या रंगमंचावर एक्सपोजर देताना प्रमाणित उत्कृष्टतेसाठी तयार करतात.

संगीत शिक्षणासाठी देवल क्लब का?

संगीत शिक्षणासाठी देवल क्लब का?

विश्वासार्ह्य

तज्ञ , अनुभवी शिक्षकांकडून गुरु – शिष्य परंपरेच्या माध्यमातून शिक्षण

सुलभ प्रवेश व वेळा

शिकवणीच्या वेळा संध्याकाळच्या असल्याने, घरकाम अथवा नोकरी / व्यवसायात कार्यरत असणाऱ्यांनादेखील शिकण्यासाठी सोयीस्कर

संगीत शिक्षण आणि प्रशिक्षण

हिंदुस्तानी स्वरसंगीत
  • स्वर आणि अलंकार
  • राग, ताल आणि लयकारीची समज
  • बंदिश, ख्याल आणि गायनाचे उप - शास्त्रीय स्वरूपे : ठुमरी, भजन, गझल
  • सादरीकरणाची कौशल्ये
हिंदुस्तानी स्वरसंगीत
वाद्य प्रशिक्षण
  • पेटी ( हार्मोनियम) - सूर आणि स्वरसंगीत
  • तबला - ताल आणि एकल सादरीकरण
  • साभिनय कथा सादरीकरण
  • व्हायोलिन आणि सतार - राग आणि शास्त्रीय स्वररचना
वाद्य प्रशिक्षण
प्रमाणपत्र

प्रमाणपत्र

प्रत्येक वर्षाच्या शेवटी, गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. यशस्वीपणे परीक्षा उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेप्रमाणे प्रमाणपत्र मिळते.

प्रवेश नोंदणी

प्रवेशासंदर्भात माहिती

शिकवणीच्या वेळा आणि परीक्षा
  • आठवड्यातून ३ वेळा वर्ग होतील ( तासाची वेळ - १ तास )
  • एका परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १२ महिन्याचा शैक्षणीक कालावधी असेल ज्याला जोडून गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा होतील
  • वार्षिक परीक्षा - एप्रिल
  • नियमित हजेरी आणि प्रगतीचे मूल्यांकन केले जाईल आणि त्यानंतर परीक्षेसाठी पात्रता ठरवण्यात येईल
शुल्क
अभ्यासक्रममासिक शुल्क (₹)
प्रारंभिका₹७५०
प्रवेशिका १ आणि २₹८५०
मध्यमा १ आणि २₹१०००
विशारद १ आणि २₹१२५०
सुगम संगीत₹७५०
विविध कार्यक्रम₹५००

महत्वाचे:

  • प्रवेशावेळी ३ महिन्याचे शुल्क भरणे आवश्यक
  • गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेचे शुल्क स्वतंत्रपणे थेट गंधर्व महाविद्यालयाला भरावे लागेल
  • शुल्काचा भरणा केवळ अधिकृत QR च्या माध्यमातूनच करावा. अनधिकृत शुल्काचा भरणा स्वीकारला जाणार नाही
  • नियमित हजेरी आणि प्रगतीचे मूल्यांकन केले जाईल आणि त्यानंतर परीक्षेसाठी पात्रता ठरवण्यात येईल
नियम

स्वयंशिस्त आणि कलेप्रती बांधिलकी!

  • उपस्थिती अनिवार्य आहे - विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेल्यातासांची संख्या पूर्ण करणे गरजेचे आहे
  • शिक्षक आणि सहाध्यायांप्रती नम्रता आणि आदरभाव राखणे आवश्यक आहे
  • गैरवर्तन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि गंभीर प्रसंगी विद्यालयातून बडतर्फ करण्यात येईल
  • जे विद्यार्थी अपेक्षित उपस्थिती पूर्ण करू शकणार नाहीत आणि अभ्यासक्रमात प्रगती दाखवणार नाहीत त्यांना परीक्षेसाठी अनुमती देण्यात येणार नाही
पालकांचा सहभाग आणि संवाद

विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये पालकांचा सजग सहभाग

  • महिन्यातून एकदा पालकांनी शिक्षकांना भेटून स्वतःच्या पाल्याच्या प्रगतीबद्दल चर्चा करावी
  • विद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना आपल्या पाल्यासोबत हजर रहावे
  • विद्यालयातील फलकांवरील सूचना नियमितपणे पहाव्यात
  • संबंधी व शिक्षक/ साथीदाराबाबत कोणत्याही प्रकारची सूचना व तक्रार असल्यास विद्यालय व्यवस्थापक, समिती प्रमुख अथवा कार्यवाह यांच्याशी संपर्क साधावा

तुमच्या पाल्याच्या शिक्षणातील तुमचा सहभाग त्याच्या प्रगतीसाठी महत्वाचा आहे

विविध कार्यक्रम

गुरु पौर्णिमा उत्सव

गुरु -शिष्य परंपरेनुसार गुरु पौर्णिमेच्या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

वार्षिक स्नेहसंमेलन

सर्व विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणासाठी वर्षातून एकदा स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. यातून विद्यार्थी वर्षभरात शिकलेली कला त्यांच्या आप्तजनांसमोर सादर करतात. यातून विद्यार्थ्यांना प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याचा अनुभव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो.

गणेशोत्सव सादरीकरण

गणेशोत्सवामध्ये, विद्यार्थी विविध कलांचे सादरीकरण करतात.

मंच प्रदर्शन

विशारदच्या विद्यार्थ्यांसाठी मंचीय आत्मविश्वास वाढावा आणि सादरीकरणात सफाईदारपणा यावा यासाठी, तबला आणि पेटीच्या साथीसह व्यक्तिगत सादरीकरणाची संधी.

देवल संगीत विद्यलयाच का?

देवल संगीत
  • अध्यापनासाठी केवळ विशारद प्राप्त शिक्षकांचेच मार्गदर्शन मिळते
  • शतकापेक्षा अधिक अनुभवाची परंपरा
  • संगीत क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी आणि यशस्वी कलाकारांकडून तसेच व्यावसायिकांकडून मार्गदर्शन
  • किफायतशीर शुल्क आणि शिष्यवृत्तीची सुविधा
  • सादरीकरणाचा अनुभव आणि संधीच्या उपलब्धी