Archive for category: सांस्कृतिक कार्यक्रम

२००० चा तो जून — पंडित आनंदराव लिमये स्मृतिनिमित्त बरवा आणि देस यांची संध्याकाळ

June in 2000 — An Evening of Barva and Des in Memory

कार्यक्रमाबद्दल

११ जून २००० रोजी कोल्हापुरातील देवल क्लब सभागृहात एका स्मृती-मैफिलीसाठी रसिक एकत्र आले. हा कार्यक्रम स्वर्गीय पंडित आनंदराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला होता — कोल्हापूरच्या संगीत परंपरेत ज्यांचे नाव आदराने घेतले जाते असे व्यक्तिमत्त्व. पावसाळ्याचे दिवस नुकतेच सुरू झाले होते, आणि सभागृहात एक विशेष शांतता भरून राहिली होती — केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर श्रवणाच्या माध्यमातून एका संगीत परंपरेला वंदन करण्यासाठी आलेल्या श्रोत्यांची ती शांतता होती.

श्रीमती मंगला जोशी यांनी मैफिलीची सुरुवात राग बरवा या गंभीर आणि विचारपूर्ण स्वरांच्या रागाने केली, जो स्मृतिसभेच्या भावनेला अनुरूप होता. त्यानंतर त्यांनी राग देस सादर केला, ज्याच्या सायंकालीन मृदू रंगांनी वातावरणात एक वेगळी उब निर्माण केली. पुढे त्यांनी नाट्यसंगीताची निवडक रचना सादर करून महाराष्ट्रीय संगीत परंपरेला अभिवादन केले. मैफिलीत राग सोहनी या नाजूक रागाची मांडणी त्यांनी संयमपूर्ण सादरीकरणातून केली, आणि शेवटी भजनाने संध्याकाळ भक्तिरसात विसावली. त्यांना श्री. जितेंद्र कुलकर्णी यांचा तबला लाभला, ज्यांची साथ संपूर्ण मैफिलीत संयमित आणि सजग होती, तसेच श्री. अण्णा बुगड यांची संवादिनी लाभली, ज्यांचे स्वर गायिकेच्या स्वरांशी एका सहज समरसतेने चालत होते. कु. रसिका वर्तक यांनी तानपुऱ्याचा आधार देत मैफिलीला स्वरांच्या केंद्रबिंदूशी जोडून ठेवले.

पंचवीस वर्षांनंतरही ही मैफिल देवल क्लबच्या संग्रहात एक नोंद म्हणून टिकून आहे — कोल्हापूरच्या संगीतप्रेमी समाजाने आपल्या दिवंगत गुरूंना कशा प्रकारे श्रद्धांजली वाहिली याची साक्ष. पंडित आनंदराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थचा हा कार्यक्रम कोणता भव्य महोत्सव नव्हता, तर एका विचारपूर्ण गायनाची संध्याकाळ होती — आणि हीच साधेपणाची गुणवत्ता त्याला कालातीत महत्त्व देते. आज देवल क्लबच्या उंबरठ्यावर येणाऱ्या रसिकांसाठी ही नोंद एक स्मरण आहे — संगीतकाराला वाहिलेली खरी श्रद्धांजली म्हणजे गायनाची अखंड परंपरा, एका स्वराने उघडलेले दार दुसऱ्या स्वराने पुढे नेणे.

सरदार आबासाहेब मुजुमदार रसिकराज पुरस्कार प्रदान सोहळा

कोल्हापूरच्या अभिजात शास्त्रीय संगीत परंपरेतील जयपूर – अत्रौली घराण्याच्या कलाकार व गानगुरु

विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांना यावर्षीचा 'सरदार आबासाहेब मुजुमदार रसिकराज पुरस्कार' प्रदान सोहळा म्हणजे संगीत प्रेमी रसिकांसाठी आनंददायी क्षण

सदर पुरस्कार सोहळा सौ. उषादेवी थोरात — भूतपूर्व डेप्युटी गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) — यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल.

या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर होईल. त्यांना तबला साथ राजप्रसाद धर्माधिकारी व हार्मोनियम साथ चिन्मय कोल्हटकर करतील.

कार्यक्रम तपशील

दिनांक

शनिवार, दि ११ एप्रिल २०२६

वेळ

सायंकाळी ०५:०० वाजता.

स्थळ

बाळासाहेब घाटगे दालन, देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर.

मान्यवर

श्रीमती अनुपमा मुजुमदार

व मुजुमदार कुटुंबीय,पुणे

व्ही.बी.पाटील

अध्यक्ष,गायन समाज देवल क्लब,कोल्हापूर.

तरी आपण याप्रसंगी उपस्थित राहून सदर सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती.

उस्ताद अल्लादिया खॉं संगीत महोत्सव - मार्च २०२६

कार्यक्रमाबद्दल

गायन समाज देवल क्लब च्या वतीने आयोजित उस्ताद अल्लादिया खॉं संगीत महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरातील रसिकांना सुरांची मेजवानी मिळाली पहिल्या दिवशी पंडित रमाकांत गायकवाड यांचे गायन तर दुसऱ्या सत्रामध्ये पंडित कैवल्य कुमार गुरव यांचं गायन झालं तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विदुषी सावनी शेंडे यांचे गायन आणि पंडित ब्रिज नारायण यांचे सरोद वादन ऐकण्यासाठी जाणकार रसिकांची चांगलीच गर्दी झाली होती. दोन दिवसांच्या या सांस्कृतिक महोत्सवामुळे कोल्हापूरचे कानसेन तृप्त झाले.

कोल्हापुरातील जेष्ठ गायक विनोद डिग्रजकर यांच्या हस्ते खासबाग मधील अलादिया खा यांच्या पुतवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सुबोध गद्रे, किशोर तिरोडकर, भाग्यश्री मुळे, राजेंद्र पित्रे, श्रीकांत डिग्रजकर, कविता घाटगे, सुरेश देशपांडे, गंधार डिग्रजकर यांच्यासह देवल क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि संगीत सम्राट उस्ताद अलादिया खाँ यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी महापौर रूपाराणी निकम, नगरसेविका माधुरी व्हटकर, ज्येष्ठ गायक विनोद डिग्रजकर देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील उपाध्यक्ष चारुदत्त जोशी कार्यवाहक सचिन पुरोहित, श्रीराम पोतनीस मंचावर उपस्थित होते दरम्यान याच कार्यक्रमात देवल क्लबच्या नव्या अध्यायावत वेबसाईटचे लॉन्चिंग करण्यात आलं. केदार पोतनीस यांच्या संकल्पनेतून बनलेल्या या वेबसाईटमुळे देवल क्लबचं नाव जागतिक डिजिटल विश्वात पोहोचलाय आजवर्षी देवल क्लब ची वाटचाल विविध कलाकारांचे कार्यक्रमाचे फोटो आणि गायनाच्या ऑडिओ क्लिप शास्त्रीय संगीताचा इतिहास आणि देवल क्लबच योगदान याबद्दल या वेबसाईटवर परिपूर्ण माहिती उपलब्ध आहे ही वेबसाईट बनवल्याबद्दल केदार पोतनीस सौभाग्यवती अबोली पोतनीस, राहुल आठले, गिरीश संगोळी, योगेश माने, विशाल कांबळे, सोनल जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शनिवारी पहिल्या सत्रात पंडित रमाकांत गायकवाड यांचे गायन झाले तर दुसऱ्या सत्रामध्ये पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी सादर केलेल्या गायनामुळे रसिक मंत्रमुक्त झाले.राग शाम कल्याण मध्ये सादर केलेली सखी मोरा मन लागे नाही बंदिश म्हणजे कसदार गायकीचा अप्रतिम नमुना ठरली आलापांवर हुकूमत आणि खडा स्वर यामुळे कैवल्य कुमार गुरव यांच्या गायनाचा श्रोत्यांवर गारुड निर्माण झालं सावनी रागातील आणि जगतालातील तृतबंदी सादर करून कैवल्यकुमार गुरव यांनी श्रोत्यांना खेळवून ठेवलं तर शुरा मी वंदिले हे तृतीयक तालातील नाट्यगीत त्यांनी सादर केलं. कैवल्यकुमार गुरव यांच्या या सादरीकरणामुळे संगीत महोत्सवाचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला रविवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी सावनी शेंडे यांनी पहिल्या सत्रात पुरिया धनश्री रागातील बंदी सादर केली. मनशांतीची सुंदर अनुभूती देणाऱ्या या रागातून त्यांनी सभागृहातील वातावरण भारावून टाकलं त्यानंतर तीन तालातील द्रुतबंदी सादर करून सावनी शेंडे यांनी रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली. शेवटी ‘नमू नमो दुर्गे महाराणी’ या गीतातून सावनी शेंडे यांनी विविध रागातील भक्ती गीत सादर केलं एकाच गाण्यात विविध रागांचे मिश्रण सादर करून त्यांनी श्रोत्यांना खुश केलं दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात पंडित ब्रिज नारायण यांचा सरोद वादन झालं प्रारंभी त्यांनी राग शंकरा सादर केला अत्यंत नादब्रम्ह असा वाद्य असलेल्या सरोद वादनातून पंडित ब्रिज नारायण यांनी श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला आणि मिश्र शिवरंजनी सादर करून सरोद वादनाचा एक उत्तम अविष्कार कोल्हापूर कराना ऐकवला दोन दिवसांच्या अल्लादिया खा संगीत महोत्सवामुळे कोल्हापूरच्या कलापरंपरेला एक वेगळी उंची आणि जळाली प्राप्त झाली.

कार्यक्रमाचे चित्रिकरण

३३ वी गोविंदराव गुणे हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा – २०२६

३३ वी गोविंदराव गुणे हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा – २०२६

स्पर्धेबद्दल

युवा पिढीमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा त्यांनी जतन करावा व संवर्धन करावा तसेच उदयोन्मुख व गुणी कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने गेली ३२ वर्षे या संस्थेतर्फे हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा आयोजित केली जात आहे. यात सहभागी स्पर्धकांनी वीस मिनिटांच्या कालावधीत बडा ख्याल व द्रुत लयीतील बंदिश सादर करावी अशी संस्थेची अपेक्षा आहे.

ही स्पर्धा दोन फेऱ्यांत होईल. पहिल्या फेरीसाठी स्पर्धकाने स्वतः हजर राहावयाचे नसून आपल्या गायनाचा व्हिडिओ ई-मेल किंवा व्हाट्सअँप किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून संस्थेकडे पाठवायचा आहे. स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२६ ही आहे. प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून काही स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम फेरी शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी गायन समाज देवल क्लबच्या बाळासाहेब घाटगे दालन येथे घेण्यात येईल.

स्पर्धेचे प्रमुख नियम व अन्य माहिती पुढीलप्रमाणे:

  • ही स्पर्धा १६ ते ४५ वयोगटातील फक्त हौशी कलाकारांसाठी खुली आहे. व्यावसायिक गायक-गायिकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. (व्यावसायिक कलाकार : जे कलाकार शास्त्रीय संगीतात आकाशवाणी किंवा दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत किंवा जे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम मानधन घेऊन सादर करतात.)
  • सहभागी स्पर्धकांनी हार्मोनियम साथ न घेता केवळ तानपुरा व तबला यांची साथ घेऊन (तानपुरा मशीन व तालमाल वापरता येईल). घरच्या घरी आपल्या गायनाचा व्हिडिओ तयार करावयाचा आहे.
  • यामध्ये कोणत्याही एका रागातील अथवा तालातील एक ख्याल पंधरा मिनिटे आणि त्याच रागातील मध्यलयीतील बंदिश पाच मिनिटे असे एकूण २० मिनिटांचे सादरीकरण व्हिडिओ क्लिपच्या स्वरूपात २५ फेब्रुवारी २०२६ पूर्वी संस्थेकडे पाठवायचे आहे.
  • स्टुडिओत केलेले ध्वनिमुद्रण ग्राह्य धरले जाणार नाही.
  • २५ फेब्रुवारी २०२६ नंतर स्पर्धकांना अंतिम फेरीचा निकाल कळविण्यात येईल. शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान अंतिम फेरी घेण्यात येईल.
  • अंतिम फेरीमध्ये, फॉर्म भरताना निवडलेल्या चार रागांपैकी परीक्षक (स्पर्धेच्या दिवशी) सांगतील त्या रागातील ख्याल (१५ मिनिटे) आणि मध्यलयीतील बंदिश (५ मिनिटे) असे एकूण २० मिनिटांचे सादरीकरण स्पर्धकाने प्रत्यक्ष हजर राहून करावयाचे आहे.
  • या अंतिम फेरीसाठी साथ संगतीसाठी आवश्यक असलेले हार्मोनियम, तानपुरा, तबला ही वाद्ये तसेच उत्तम वादक यांचे आयोजन संस्था करील.
  • तुमच्या सादरीकरणापूर्वी सभागृहात तसेच स्वतंत्र कक्षामध्ये साथीदारांसह तालीम करता येईल.
  • अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना (संस्थेने निर्धारित केल्यानुसार) योग्य तो प्रवास खर्च देण्यात येईल. तसेच फक्त स्पर्धकांची भोजन व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येईल.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.​

प्रवेश फी

स्पर्धेची प्रवेश फी रु. ५००/- आहे. ती खालील बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करता येईल.

  • Bank Name: Union Bank of India
  • Account Name: Gayan Samaj Deval Club, Kolhapur
  • A/c No.: 321402010109172
  • IFSC Code: UBIN0532142

पारितोषिके

प्रथम

रु. १०,०००/-

(एस. जी. फायटो फार्मा प्रा. लि. पुरस्कृत)

द्वितीय

रु. ७,०००/-

(फायटो मार्केटिंग प्रा. लि. पुरस्कृत)

तृतीय

रु. ५,०००/-

(सोलर हर्बो प्रा. लि. पुरस्कृत)

उत्तेजनार्थ

रु. १,०००/- (प्रत्येकी – २)

(शरद दत्तात्रय पिशवीकर व पिशवीकर कुटुंबीय यांच्याकडून पुरस्कृत)

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.

प्रथम पारितोषिक: रु. १०,०००/-
(एस. जी. फायटो फार्मा प्रा. लि. पुरस्कृत)

द्वितीय पारितोषिक: रु. ७,०००/-
(फायटो मार्केटिंग प्रा. लि. पुरस्कृत)

तृतीय पारितोषिक: रु. ५,०००/-
(सोलर हर्बो प्रा. लि. पुरस्कृत)

उत्तेजनार्थ पारितोषिक:
रु. १,०००/- प्रत्येकी – २
(शरद दत्तात्रय पिशवीकर व पिशवीकर कुटुंबीय यांच्याकडून पुरस्कृत)

तसेच जयपूर-अतरौली घराण्याच्या गान वैशिष्ट्यांची जोपासना करून गायन सादर करणाऱ्या प्रतिभावंत कलाकाराला विदुषी श्रुती सडोलिकर-काटकर यांचे कडून उस्ताद अजीजुद्दीन खान यांचे स्मरणार्थ विशेष पारितोषिक दिले जाईल.

अंतिम फेरी स्पर्धेनंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ होईल.

हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा – नोंदणी अर्ज

Registration Closed
Registrations are closed for this event.

गायन समाज देवल क्लब, एन.सी.पी.ए. आणि सिटी बँक यांच्या
सहसंयोजनाने आयोजित

केदार केळकर

यांचे शास्त्रीय गायन
गुरु : पं.मेघनाथ कोल्हापुरे, पं.सुहास व्यास

तबला : प्रदीप कुलकर्णी – हार्मोनियम : संदीप तावरे

————————————————————————

गौतमी चिपळूणकर

यांचे शास्त्रीय गायन
गुरु : पद्मश्री पं.उल्हास कशाळकर,
पद्मविभूषण डॉ.गिरीजादेवी

तबला : गिरीधर कुलकर्णी – हार्मोनियम : स्वरूप दिवाण


गुरुवार, दि.१२ फेब्रुवारी २०२६ सायं.०६:०० वाजता.

स्थळ : बाळासाहेब घाटगे दालन,गायन समाज देवल क्लब,
कोल्हापूर
————————————————————————-
सर्व संगीतप्रेमी रसिकांना विनामूल्य प्रवेश

गायन समाज देवल क्लब, एन.सी.पी.ए. आणि सिटी बँक यांच्या
सहसंयोजनाने आयोजित


आदित्य मोडक
यांचे शास्त्रीय गायन
( गुरु : पं.राम देशपांडे )

राजेंद्र कुलकर्णी
यांचे बासरी वादन
( गुरु : पं.नारायणराव पटवर्धन )

——————————————-

तबला : स्वप्नील भिसे / शंतनू देशमुख
हार्मोनियम : स्वरूप दिवाण

————————————————————————-

शनिवार दि.०७ फेब्रुवारी २०२६ सायं.०६:०० वाजता.

स्थळ : बाळासाहेब घाटगे दालन,गायन समाज देवल क्लब,
कोल्हापूर

————————————————————————-

सर्व संगीतप्रेमी रसिकांना विनामूल्य प्रवेश

ओंकार नृत्य साधना, गुलबर्गा, गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

संगीत व कलाप्रेमी कै. प्रकाश पुरोहित, कै. डॉ.अरुण पुरोहित व कै. अनघा पुरोहित यांच्या स्मरणार्थ, नृत्याविष्कार

डॉ. सौ. शुभांगी यांच्या ” ओंकार नृत्य साधना, गुलबर्गा ” येथील विद्यार्थिनी, भरतनाट्यम व विविध नृत्यआविष्कार सादर करणार आहेत.

या पर्वणीचा उपस्थित राहून आनंद घेता यावा, यासाठी मुद्दाम आधी कळवत आहोत.

कार्यक्रम स्थळ :
गोविंदराव टेंबे रंगमंदिर,कोल्हापूर.
सोमवार दि.१६ फेब्रुवारी २०२६. सायंकाळ ०५ : ३० वा.

————————————————————————————————————————————

Organized jointly by Omkar Nritya Sadhana, Gulbarga and Gayan Samaj Deval Club, Kolhapur,

a dance presentation is being held in memory of music and art lovers Late Prakash Purohit, Late Dr. Arun Purohit, and Late Anagha Purohit.

Students of Dr. Sou. Shubhangi from Omkar Nritya Sadhana, Gulbarga will present Bharatanatyam and various other dance performances.

We are informing you well in advance so that you may attend and enjoy this special occasion.

Venue:
Govindrao Tembe Rangmandir, Kolhapur

Date & Time:
Monday, 16th February 2026, at 5:30 PM

© देवल क्लब सर्व अधिकार अधीन

Developed and maintained by Mobifilia

© देवल क्लब सर्व अधिकार अधीन
Developed and maintained by Mobifilia
एफसीआरए: ०८३८६००३५ प्रदेश: भारत
एनजीओ दर्पण: एमएच/२०१७/०१७८९६३