गायन समाज देवल क्लब येथे कलेची आवड असणारे आणि स्वतःला कलेमध्ये आजमावू पाहणारे विद्यार्थी येतात आणि स्वतःच्या आवडीचे रूपांतर कौशल्यामध्ये करतात.
शास्त्रीय संगीत, नृत्य आणि नाट्य या कलांच्या जपणुकीमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या देवल क्लब या संस्थेने या कलांच्या शिकवणीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
तुम्हाला घुंगरांच्या नादात तल्लीन होऊन नृत्य करायचे आहे? कि तंबोऱ्याच्या शांत सुरात सूर मिसळायचा आहे? की, रंगमंचावर आपली नाट्यकला सादर करायची आहे? कुठलीही कला असून, देवल क्लबचे संगीत विद्यालय आणि व्यासपीठ तुमच्यासाठी खुले आहे.
