
गायन समाज देवल क्लब येथील नृत्यशाखा
देवल संगीत विद्यालय ही गायन समाज देवल क्लबचीच एक शाखा असून, हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्याच्या संवर्धनासाठी आणि प्रशिक्षणासाठी काम करते. विद्यालयामध्ये गुरु-कुल परंपरेचे पालन केले जाते. शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या अभ्यासक्रमचे देखील अध्यापन केले जाते. यामुळे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा सराव होतो आणि परीक्षेद्वारे त्यांना प्रमाणपत्र मिळते.

कथ्थक व भरतनाट्यमच्या प्रशिक्षणकरता देवल विद्यालयच का?
किफायतशीर
परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण शिक्षण, सोबत निवडक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुविधा.
विश्वासार्ह्य
तज्ञ , अनुभवी शिक्षकांकडून गुरु – शिष्य परंपरेच्या माध्यमातून शिक्षण
सुलभ प्रवेश व वेळा
शिकवणीच्या वेळा संध्याकाळच्या असल्याने, घरकाम अथवा नोकरी / व्यवसायात कार्यरत असणाऱ्यांनादेखील शिकण्यासाठी सोयीस्कर
शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण
अभ्यासक्रमाचे स्वरूप
- कथ्थक नृत्याची प्राथमिक ओळख
- मुद्राभ्यास
- पदन्यास व तालाची समज
- तालाची ओळख व लयीचा अभ्यास
- चक्कर आणि थाट

- तटकार व चक्कर
- तालाची सखोल समज व लयकारी
- अभिनय
- छोट्या नृत्य स्पर्धांची तयारी
- शास्त्रीय वाद्यांची ओळख

- लयकारी आणि तालचक्राची सखोल समज
- सादरीकरण कौशल्य आणि मंचीय समज
- कथेचे साभिनय सादरीकरण ( अभिनय आणि भाव )
- पारंपरिक कथ्थक रचना ( ठुमरी, भजन, तराना)
- उत्फुर्त सादरीकरण आणि नृत्य दिग्दर्शन

- भरतनाट्यममधील प्राथमिक धडे
- विविध शास्त्रीय नाट्यप्रकारांची ओळख
- Basic Adavus Training
- थाट आणि तालाचे शिक्षण
- मूलभूत सैद्धांतिक तत्वे

- हस्तमुद्रा व ग्रीवाभेद
- तालावरील तज्ञता
- सिद्धांत आणि नृत्य परिभाषा
- प्रात्यक्षिक प्रशिक्षण
- नृत्य घटकांचा नृत्याविष्कारात वापर

- अडवू
- अभिनय
- त्रिकालाम
- विनियोग
- रंगमंच सादरीकरणाची तयारी


प्रमाणपत्र
प्रत्येक वर्षाच्या शेवटी, गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. यशस्वीपणे परीक्षा उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेप्रमाणे प्रमाणपत्र मिळते.
प्रवेशासंदर्भात माहिती
शिकवणीच्या वेळा आणि परीक्षा
- आठवड्यातून ३ वेळा वर्ग होतील ( तासाची वेळ - १ तास )
- एका परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १२ महिन्याचा शैक्षणीक कालावधी असेल ज्याला जोडून गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा होतील
- वार्षिक परीक्षा - एप्रिल
- नियमित हजेरी आणि प्रगतीचे मूल्यांकन केले जाईल आणि त्यानंतर परीक्षेसाठी पात्रता ठरवण्यात येईल
शुल्क
| अभ्यासक्रम | मासिक शुल्क (₹) |
|---|---|
| प्रारंभिका | ₹७५० |
| प्रवेशिका १ आणि २ | ₹८५० |
| मध्यमा १ आणि २ | ₹१००० |
| विशारद १ आणि २ | ₹१२५० |
| विविध कार्यक्रम | ₹५०० |
महत्वाचे:
- प्रवेशावेळी ३ महिन्याचे शुल्क भरणे आवश्यक
- गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेचे शुल्क स्वतंत्रपणे थेट गंधर्व महाविद्यालयाला भरावे लागेल
- शुल्काचा भरणा केवळ अधिकृत QR च्या माध्यमातूनच करावा. अनधिकृत शुल्काचा भरणा स्वीकारला जाणार नाही
- नियमित हजेरी आणि प्रगतीचे मूल्यांकन केले जाईल आणि त्यानंतर परीक्षेसाठी पात्रता ठरवण्यात येईल.
नियम
- स्वयंशिस्त आणि कलेप्रती बांधिलकी!
- उपस्थिती अनिवार्य आहे - विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेल्यातासांची संख्या पूर्ण करणे गरजेचे आहे
- शिक्षक आणि सहाध्यायांप्रती नम्रता आणि आदरभाव राखणे आवश्यक आहे
- गैरवर्तन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि गंभीर प्रसंगी विद्यालयातून बडतर्फ करण्यात येईल
- नृत्याच्या विद्यार्थ्यांनी नृत्यासाठी आवश्यक असा पोशाख करणे गरजेचे आहे
- जे विद्यार्थी अपेक्षित उपस्थिती पूर्ण करू शकणार नाहीत आणि अभ्यासक्रमात प्रगती दाखवणार नाहीत त्यांना परीक्षेसाठी अनुमती देण्यात येणार नाही
पालकांचा सहभाग आणि संवाद
- विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये पालकांचा सजग सहभाग
- महिन्यातून एकदा पालकांनी शिक्षकांना भेटून स्वतःच्या पाल्याच्या प्रगतीबद्दल चर्चा करावी
- विद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना आपल्या पाल्यासोबत हजर रहावे
- नियमितपणे विद्यालयातील सूचना फलकांवरील सूचना पहाव्यात
- संबंधी व शिक्षक/ साथीदाराबाबत कोणत्याही प्रकारची सूचना व तक्रार असल्यास विद्यालय व्यवस्थापक, समिती प्रमुख अथवा कार्यवाह यांच्याशी संपर्क साधावा
- तुमच्या पाल्याच्या शिक्षणातील तुमचा सहभाग त्याच्या प्रगतीसाठी महत्वाचा आहे
विविध कार्यक्रम
गुरु पौर्णिमा उत्सव
गुरु -शिष्य परंपरेनुसार गुरु पौर्णिमेच्या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
वार्षिक स्नेहसंमेलन
सर्व विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणासाठी वर्षातून एकदा स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. यातून विद्यार्थी वर्षभरात शिकलेली कला त्यांच्या आप्तजनांसमोर सादर करतात. यातून विद्यार्थ्यांना प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याचा अनुभव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो
गणेशोत्सव सादरीकरण
गणेशोत्सवामध्ये, विद्यार्थी विविध कलांचे सादरीकरण करतात.
मंच प्रदर्शन
विशारदच्या विद्यार्थ्यांसाठी मंचीय आत्मविश्वास वाढावा आणि सादरीकरणात सफाईदारपणा यावा यासाठी, तबला आणि पेटीच्या साथीसह व्यक्तिगत सादरीकरणाची संधी

देवल संगीत विद्यलयाच का?
- राष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त प्रमाणपत्र ( गांधर्व महाविद्यालय मंडळ यांचे )
- रचनाबद्ध अभ्यासक्रम आणि मंचीय सादरीकरणाची संधी
- किफायतशीर शुल्क आणि शिष्यवृत्तीची सुविधा
- सादरीकरण कलांमध्ये शतकभरापेक्षा अधिक अनुभवाची परंपरा
- अध्यापनासाठी केवळ विशारद प्राप्त शिक्षकांची नेमणूक केली जाते जेणेकरून तज्ञ शिक्षकांचेच मार्गदर्शन मिळेल.
