स्थापनेपासून भविष्याच्या दिशेने : देवल क्लबची सुवर्णगाथा
1883
करवीर गायन समाजची स्थापना
गोविंदराव देवल यांच्या पुढाकाराने कोल्हापुरातल्या संगीतप्रेमी रसिकांनी कोल्हापुरात गायन समाज देवल क्लबची स्थापना केली. आपण रुजवलेल्या या छोटाश्या रोपट्याचे एका वटवृक्षात रूपांतर होणार आहे याची त्यावेळी त्यांनी कल्पना देखील केले नसेल..
1890
कोल्हापुरातील पहिली संगीत शिकवणी
चिमणीच्या मिणमिणत्या उजेडात जिथे पहिल्यांदा रागदारीचे सूर आळवले गेले त्या संस्थेची आता कोल्हापुरात प्रशस्त इमारत असून, संगीत शिक्षणाचे शास्त्रीय पद्धतीने शिक्षण दिले जाते
1893
देवल क्लबची स्थापना
संगीत संमेलनांच्या या मैफिलींच पुढे एका परंपरेत रूपांतर झालं. एका छोट्या संगीतप्रेमी समूहाने एकत्र आणलेले कलाकार, संगीत विषयक अभ्यासक आणि संगीताचे आश्रयदाते आजपर्यंत हिंदुस्तानी संगीताचा उत्सव साजरा करत आहेत.
1895
उस्ताद अल्लादियाखां देवल क्लबच्या प्रवासात सामील झाले
जयपूर घराण्याचे दिग्गज अल्लादियाखा यांनी देवल क्लबला एक नवीन आयाम दिला आणि त्याच बरोबर कोल्हापूरच्या गायकीला त्यांच्या स्वतःच्या विशेष गायन शैलीची ओळख करून दिली.
1916
विनोद’ पहिला नाट्यप्रयोग
नाट्यगृह उभे राहिले. दवेल क्लबमध्ये आता नाटकाचे प्रयोग होण्यास सुरवात झाली, सामाजिक प्रश्नांवर तिरकस भाष्य करणारी नाटके सादर होऊ लागली ज्यामध्ये उद्याच्या चित्रपट विश्वातील उभारते कलाकार काम करू लागले.
1919
छत्रपती शाहू महाराजांनकडून जमीन मिळाली – त्यावर क्लबची इमारत उभी राहिली
क्लबच्या कामाची समाजासाठी असणारी गरज ओळखून आणि कामाचे स्वरूप पाहून शाहू महाराजांनी आवश्यक ती जमीन देवल क्लबला बक्षीस स्वरूपात दिली, ज्यामुळे क्लबला कायमस्वरूपी एक हक्काची जागा उपलब्ध झाली.
1921
संगीत शिक्षणाचे औपचारिक शिक्षण देणाऱ्या विद्यालयाची सुरवात
शिस्तबद्ध परंतु गुरु -कुल पद्धतीने शिक्षण देणारी संस्था उदयास येऊ लागली आणि महाराष्ट्रभरातुन विद्यार्थी शिक्षणासाठी येथे प्रवेश घेऊ लागले.
1946
करवीर गायन समाज आणि देवल क्लब यांचे विलीनीकरण
करवीर गायन समाज आणि देवल क्लब या दोन महत्वाच्या संगीत संस्था एकत्र आल्या आणि कोल्हापुरात एक अभिनव सांस्कृतिक प्रवाह निर्माण झाला.
1960
नाट्यदालनाला प्रायोगितेची झालर
क्लबच्या माध्यमातून आधुनिक कथाकथन, अभिजात नाट्यकला आणि समकालीन कथासूत्रांना एकत्र करून प्रायोगिक नाट्य विचार आणि सादरीकरण सुरु झाले
1972
संगीतनाटक- ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ – एक मैलाचा दगड
क्लबने एका ऐतिहासिक आणि आव्हानात्मक संगीत नाटकाची निर्मिती केली
1983
लांबलेला शताब्दी महोत्सव
आर्थिक चणचणीमुळे क्लबच्या शताब्दी महोत्सव साजरा झाला नाही पण संगीतसाधना सुरूच राहिली
1987
क्लबचा शताब्दी उत्सव
निधीच्या तरतुदीनंतर चार दिवसांचा शताब्दी महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला जिथे दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आणि हजारो लोक त्याचे साक्षीदार बनले
1991
नाट्यक्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी काकासाहेब खाडिलकर पुरस्कार
नाट्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल क्लबचा सन्मान
1992
कलेतील प्रतिभा शोधण्यासाठी स्पर्धांचे आयोजन
प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन
2025
देवल संगीत विद्यालय – हिंदुस्थानी संगीताच्या संवर्धनासाठी आश्वासक पर्याय
क्लबमध्ये दरवर्षी तीनशेहून अधिक मुलांना प्रशिक्षण दिले जाते आणि शास्त्रीय कलेच्या जोपासनेची परंपरा अविरतपणे सुरु असते
करवीर गायन समाजची स्थापना
कोल्हापुरातील पहिली संगीत शिकवणी
देवल क्लबची स्थापना
उस्ताद अल्लादियाखां देवल क्लबच्या प्रवासात सामील झाले
विनोद’ पहिला नाट्यप्रयोग
छत्रपती शाहू महाराजांनकडून जमीन मिळाली – त्यावर क्लबची इमारत उभी राहिली
संगीत शिक्षणाचे औपचारिक शिक्षण देणाऱ्या विद्यालयाची सुरवात
करवीर गायन समाज आणि देवल क्लब यांचे विलीनीकरण
नाट्यदालनाला प्रायोगितेची झालर
संगीतनाटक- ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ – एक मैलाचा दगड
लांबलेला शताब्दी महोत्सव
क्लबचा शताब्दी उत्सव
नाट्यक्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी काकासाहेब खाडिलकर पुरस्कार
कलेतील प्रतिभा शोधण्यासाठी स्पर्धांचे आयोजन
देवल संगीत विद्यालय – हिंदुस्थानी संगीताच्या संवर्धनासाठी आश्वासक पर्याय
क्लबच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या धुरिणांचा गौरव
द्रष्टे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ शासक नव्हते तर खोरोखऱ प्रजेचे पालक होते. शिक्षण, सामाजिक न्याय, उद्योग, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्राच्या वृद्धीसाठी त्यांनी आपले प्रशासन कमी लावले.
- देवल क्लबची खरी गरज ओळखून महाराज देवल क्लबचे पहिले आश्रयदाते बनले.
- १९१९ मध्ये त्यांनी उदारपणे क्लबला रु. ३०००/- म्हणजे साधारण आताच्या १६ कोटी इतकी देणगी दिली. ज्यामुळे देवल क्लबची स्वतःची इमारत बंधने शक्य झाले आणि क्लबला स्वतःचा कायमस्वरूपी निवारा मिळाला.
- त्यांच्या राजाश्रयामुळे आणि कलाकारांमध्ये त्यांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे उत्कृष्ट संगीतकार कोल्हापूरकडे आणि पर्यायाने क्लबकडे आकर्षित झाले, ज्यामुळे क्लबचा दर्जा राष्ट्रीय स्तरावर उंचावला.
- शाहू महाराज केवळ एक परोपकारी व्यक्ती नव्हते, तर ते हिंदुस्तानी संगीताचे खरे जाणकार होते आणि त्यांनी कोल्हापुरात एक सांस्कृतिक चळवळजोपासली.
त्यांच्या या द्रष्ट्या कार्याला देवल क्लबचा सलाम ! त्यांच्या बिनशर्त अशा सहकार्यामुळे क्लब हे कलाकार, कला आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे एक उर्जास्थान बनले. असे उर्जास्थान जे अजूनही कलाकारांना आणि कलेला वृद्धिंगत करते आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
कलेला मिळालेला राजाश्रय
श्रीमंत ताराबाई छत्रपती
कलेच्या शाही आश्रयदात्या
बाबा देवल
स्वप्नांचे रचनाकार
उस्ताद अल्लादिया खां
जयपूर गायकीचा आत्मा
