सरदार आबासाहेब मुजुमदार रसिकराज पुरस्कार प्रदान सोहळा

- सांस्कृतिक · Cultural Events
कोल्हापूरच्या अभिजात शास्त्रीय संगीत परंपरेतील जयपूर – अत्रौली घराण्याच्या कलाकार व गानगुरु
विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांना यावर्षीचा 'सरदार आबासाहेब मुजुमदार रसिकराज पुरस्कार' प्रदान सोहळा म्हणजे संगीत प्रेमी रसिकांसाठी आनंददायी क्षण
सदर पुरस्कार सोहळा सौ. उषादेवी थोरात — भूतपूर्व डेप्युटी गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) — यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल.
या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर होईल. त्यांना तबला साथ राजप्रसाद धर्माधिकारी व हार्मोनियम साथ चिन्मय कोल्हटकर करतील.
कार्यक्रम तपशील
दिनांक
शनिवार, दि ११ एप्रिल २०२६
वेळ
सायंकाळी ०५:०० वाजता.
स्थळ
बाळासाहेब घाटगे दालन, देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर.
मान्यवर
श्रीमती अनुपमा मुजुमदार
व मुजुमदार कुटुंबीय,पुणे
व्ही.बी.पाटील
अध्यक्ष,गायन समाज देवल क्लब,कोल्हापूर.
तरी आपण याप्रसंगी उपस्थित राहून सदर सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती.


