३३ वी गोविंदराव गुणे हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा – २०२६
३३ वी गोविंदराव गुणे हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा – २०२६

स्पर्धेबद्दल
युवा पिढीमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा त्यांनी जतन करावा व संवर्धन करावा तसेच उदयोन्मुख व गुणी कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने गेली ३२ वर्षे या संस्थेतर्फे हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा आयोजित केली जात आहे. यात सहभागी स्पर्धकांनी वीस मिनिटांच्या कालावधीत बडा ख्याल व द्रुत लयीतील बंदिश सादर करावी अशी संस्थेची अपेक्षा आहे.
ही स्पर्धा दोन फेऱ्यांत होईल. पहिल्या फेरीसाठी स्पर्धकाने स्वतः हजर राहावयाचे नसून आपल्या गायनाचा व्हिडिओ ई-मेल किंवा व्हाट्सअँप किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून संस्थेकडे पाठवायचा आहे. स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२६ ही आहे. प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून काही स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम फेरी शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी गायन समाज देवल क्लबच्या बाळासाहेब घाटगे दालन येथे घेण्यात येईल.
स्पर्धेचे प्रमुख नियम व अन्य माहिती पुढीलप्रमाणे:
- ही स्पर्धा १६ ते ४५ वयोगटातील फक्त हौशी कलाकारांसाठी खुली आहे. व्यावसायिक गायक-गायिकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. (व्यावसायिक कलाकार : जे कलाकार शास्त्रीय संगीतात आकाशवाणी किंवा दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत किंवा जे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम मानधन घेऊन सादर करतात.)
- सहभागी स्पर्धकांनी हार्मोनियम साथ न घेता केवळ तानपुरा व तबला यांची साथ घेऊन (तानपुरा मशीन व तालमाल वापरता येईल). घरच्या घरी आपल्या गायनाचा व्हिडिओ तयार करावयाचा आहे.
- यामध्ये कोणत्याही एका रागातील अथवा तालातील एक ख्याल पंधरा मिनिटे आणि त्याच रागातील मध्यलयीतील बंदिश पाच मिनिटे असे एकूण २० मिनिटांचे सादरीकरण व्हिडिओ क्लिपच्या स्वरूपात २५ फेब्रुवारी २०२६ पूर्वी संस्थेकडे पाठवायचे आहे.
- स्टुडिओत केलेले ध्वनिमुद्रण ग्राह्य धरले जाणार नाही.
- २५ फेब्रुवारी २०२६ नंतर स्पर्धकांना अंतिम फेरीचा निकाल कळविण्यात येईल. शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान अंतिम फेरी घेण्यात येईल.
- अंतिम फेरीमध्ये, फॉर्म भरताना निवडलेल्या चार रागांपैकी परीक्षक (स्पर्धेच्या दिवशी) सांगतील त्या रागातील ख्याल (१५ मिनिटे) आणि मध्यलयीतील बंदिश (५ मिनिटे) असे एकूण २० मिनिटांचे सादरीकरण स्पर्धकाने प्रत्यक्ष हजर राहून करावयाचे आहे.
- या अंतिम फेरीसाठी साथ संगतीसाठी आवश्यक असलेले हार्मोनियम, तानपुरा, तबला ही वाद्ये तसेच उत्तम वादक यांचे आयोजन संस्था करील.
- तुमच्या सादरीकरणापूर्वी सभागृहात तसेच स्वतंत्र कक्षामध्ये साथीदारांसह तालीम करता येईल.
- अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना (संस्थेने निर्धारित केल्यानुसार) योग्य तो प्रवास खर्च देण्यात येईल. तसेच फक्त स्पर्धकांची भोजन व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येईल.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
प्रवेश फी
स्पर्धेची प्रवेश फी रु. ५००/- आहे. ती खालील बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करता येईल.
- Bank Name: Union Bank of India
- Account Name: Gayan Samaj Deval Club, Kolhapur
- A/c No.: 321402010109172
- IFSC Code: UBIN0532142
पारितोषिके
प्रथम
रु. १०,०००/-
(एस. जी. फायटो फार्मा प्रा. लि. पुरस्कृत)
द्वितीय
रु. ७,०००/-
(फायटो मार्केटिंग प्रा. लि. पुरस्कृत)
तृतीय
रु. ५,०००/-
(सोलर हर्बो प्रा. लि. पुरस्कृत)
उत्तेजनार्थ
रु. १,०००/- (प्रत्येकी – २)
(शरद दत्तात्रय पिशवीकर व पिशवीकर कुटुंबीय यांच्याकडून पुरस्कृत)
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
प्रथम पारितोषिक: रु. १०,०००/-
(एस. जी. फायटो फार्मा प्रा. लि. पुरस्कृत)
द्वितीय पारितोषिक: रु. ७,०००/-
(फायटो मार्केटिंग प्रा. लि. पुरस्कृत)
तृतीय पारितोषिक: रु. ५,०००/-
(सोलर हर्बो प्रा. लि. पुरस्कृत)
उत्तेजनार्थ पारितोषिक:
रु. १,०००/- प्रत्येकी – २
(शरद दत्तात्रय पिशवीकर व पिशवीकर कुटुंबीय यांच्याकडून पुरस्कृत)
तसेच जयपूर-अतरौली घराण्याच्या गान वैशिष्ट्यांची जोपासना करून गायन सादर करणाऱ्या प्रतिभावंत कलाकाराला विदुषी श्रुती सडोलिकर-काटकर यांचे कडून उस्ताद अजीजुद्दीन खान यांचे स्मरणार्थ विशेष पारितोषिक दिले जाईल.
अंतिम फेरी स्पर्धेनंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ होईल.
हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा – नोंदणी अर्ज
Registrations are closed for this event.


