उस्ताद अल्लादिया खॉं संगीत महोत्सव - मार्च २०२६

कार्यक्रमाबद्दल
गायन समाज देवल क्लब च्या वतीने आयोजित उस्ताद अल्लादिया खॉं संगीत महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरातील रसिकांना सुरांची मेजवानी मिळाली पहिल्या दिवशी पंडित रमाकांत गायकवाड यांचे गायन तर दुसऱ्या सत्रामध्ये पंडित कैवल्य कुमार गुरव यांचं गायन झालं तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विदुषी सावनी शेंडे यांचे गायन आणि पंडित ब्रिज नारायण यांचे सरोद वादन ऐकण्यासाठी जाणकार रसिकांची चांगलीच गर्दी झाली होती. दोन दिवसांच्या या सांस्कृतिक महोत्सवामुळे कोल्हापूरचे कानसेन तृप्त झाले.
कोल्हापुरातील जेष्ठ गायक विनोद डिग्रजकर यांच्या हस्ते खासबाग मधील अलादिया खा यांच्या पुतवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सुबोध गद्रे, किशोर तिरोडकर, भाग्यश्री मुळे, राजेंद्र पित्रे, श्रीकांत डिग्रजकर, कविता घाटगे, सुरेश देशपांडे, गंधार डिग्रजकर यांच्यासह देवल क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि संगीत सम्राट उस्ताद अलादिया खाँ यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी महापौर रूपाराणी निकम, नगरसेविका माधुरी व्हटकर, ज्येष्ठ गायक विनोद डिग्रजकर देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील उपाध्यक्ष चारुदत्त जोशी कार्यवाहक सचिन पुरोहित, श्रीराम पोतनीस मंचावर उपस्थित होते दरम्यान याच कार्यक्रमात देवल क्लबच्या नव्या अध्यायावत वेबसाईटचे लॉन्चिंग करण्यात आलं. केदार पोतनीस यांच्या संकल्पनेतून बनलेल्या या वेबसाईटमुळे देवल क्लबचं नाव जागतिक डिजिटल विश्वात पोहोचलाय आजवर्षी देवल क्लब ची वाटचाल विविध कलाकारांचे कार्यक्रमाचे फोटो आणि गायनाच्या ऑडिओ क्लिप शास्त्रीय संगीताचा इतिहास आणि देवल क्लबच योगदान याबद्दल या वेबसाईटवर परिपूर्ण माहिती उपलब्ध आहे ही वेबसाईट बनवल्याबद्दल केदार पोतनीस सौभाग्यवती अबोली पोतनीस, राहुल आठले, गिरीश संगोळी, योगेश माने, विशाल कांबळे, सोनल जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शनिवारी पहिल्या सत्रात पंडित रमाकांत गायकवाड यांचे गायन झाले तर दुसऱ्या सत्रामध्ये पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी सादर केलेल्या गायनामुळे रसिक मंत्रमुक्त झाले.राग शाम कल्याण मध्ये सादर केलेली सखी मोरा मन लागे नाही बंदिश म्हणजे कसदार गायकीचा अप्रतिम नमुना ठरली आलापांवर हुकूमत आणि खडा स्वर यामुळे कैवल्य कुमार गुरव यांच्या गायनाचा श्रोत्यांवर गारुड निर्माण झालं सावनी रागातील आणि जगतालातील तृतबंदी सादर करून कैवल्यकुमार गुरव यांनी श्रोत्यांना खेळवून ठेवलं तर शुरा मी वंदिले हे तृतीयक तालातील नाट्यगीत त्यांनी सादर केलं. कैवल्यकुमार गुरव यांच्या या सादरीकरणामुळे संगीत महोत्सवाचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला रविवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी सावनी शेंडे यांनी पहिल्या सत्रात पुरिया धनश्री रागातील बंदी सादर केली. मनशांतीची सुंदर अनुभूती देणाऱ्या या रागातून त्यांनी सभागृहातील वातावरण भारावून टाकलं त्यानंतर तीन तालातील द्रुतबंदी सादर करून सावनी शेंडे यांनी रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली. शेवटी ‘नमू नमो दुर्गे महाराणी’ या गीतातून सावनी शेंडे यांनी विविध रागातील भक्ती गीत सादर केलं एकाच गाण्यात विविध रागांचे मिश्रण सादर करून त्यांनी श्रोत्यांना खुश केलं दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात पंडित ब्रिज नारायण यांचा सरोद वादन झालं प्रारंभी त्यांनी राग शंकरा सादर केला अत्यंत नादब्रम्ह असा वाद्य असलेल्या सरोद वादनातून पंडित ब्रिज नारायण यांनी श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला आणि मिश्र शिवरंजनी सादर करून सरोद वादनाचा एक उत्तम अविष्कार कोल्हापूर कराना ऐकवला दोन दिवसांच्या अल्लादिया खा संगीत महोत्सवामुळे कोल्हापूरच्या कलापरंपरेला एक वेगळी उंची आणि जळाली प्राप्त झाली.































